• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भडगावात बॅटरी चोरांना बेड्या: दोघांकडून दुचाकीसह ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 25, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भडगावात बॅटरी चोरांना बेड्या: दोघांकडून दुचाकीसह ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त

भडगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातून वाहनाच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५३ हजार रुपये किमतीच्या अनेक बॅटऱ्या आणि एक टी.व्ही.एस. कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २१ जून रोजी रात्री १० ते २२ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान नासिर खान रशीद खान (वय ५२, चालक, रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) यांच्यासह इतर तक्रारदारांच्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याचा भडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सफौ प्रदीप चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या गोपनीय माहितीच्या आधारे, चोरी केलेल्या गाड्यांच्या बॅटऱ्या भडगाव शहरातील समीर शेख कदीर शेख आणि शोएब सैय्यद मुनव्वर (दोघे रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) यांनी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच, पोलिसांनी समीर शेख आणि शायब सैय्यद यांना ताब्यात घेतले. २२ जून रोजी त्यांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत चौकशी केली असता, त्यांनी ग्रीनपार्कजवळील शाळेतून चोरी केलेल्या बॅटरीजसह इतर ठिकाणांहून चोरलेल्या बॅटऱ्यांची कबुली दिली. आरोपींनी काढून दिलेल्या बॅटऱ्या पोलिसांनी जप्त केल्या. यामध्ये एकसाईड कंपनीच्या विविध गाड्यांच्या आणि ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या तसेच एक काळ्या रंगाची टी.व्ही.एस. वेगो दुचाकी (क्र. एमएच ०४ एफएक्स १२४७) असा एकूण ६३,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ प्रदीप चौधरी, पाहेकॉ निलेश ब्राम्हणकार, पोकॉ प्रवीण परदेशी, पोकॉ अमजद पठाण, पोकॉ सुनील राजपूत यांनी यशस्वीपणे पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास सफौ प्रदीप चौधरी करत आहेत.

Next Post
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने शेअर एजंटला २५ लाखांचा गंडा; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने शेअर एजंटला २५ लाखांचा गंडा; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली
जळगाव जिल्हा

जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group