भुसावळ, प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने फिजिओथेरेपी सप्ताहाअंतर्गत भुसावळ येथील आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कर्डिओ- रेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर,राहुल गिरी (प्रशासकीय अधिकारी) यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. अमित जैस्वाल (विभागप्रमुख – हृदय व श्वसन फिजिओथेरपी), डॉ. प्रियांका घुमनानी (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. सुदेश वायदंडे (निवासी डॉक्टर), डॉ. पूजा गुरुदासानी (निवासी डॉक्टर) आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.

फिटनेस मूल्यांकन शिबिराचे व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेने केले. शिबिरामध्ये एकूण ३० पोलीस अधिकार्यांची तपासणी करण्यात आली व त्यांच्या हृदय व श्वसनविषयक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनासाठी वायएमसीए ३ मिनिट स्टेप टेस्ट घेण्यात आला.
पोलीस अधिकार्यांच्या हृदय व श्वसनविषयक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.









