• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना प्रा. लीना पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील शिक्षकांचे स्थान व नैतिक मूल्यांचे महत्त्व विशद केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीलिमा वारके यांनी संबोधित करताना सांगितले की, शिक्षक हे जीवनातील ज्ञानाचे दीपस्तंभ असतात. आई-वडिलांनंतर योग्य मार्ग दाखवणारे, गुणांना वाव देणारे आणि विचारांना योग्य दिशा देऊन भविष्य घडवणारे कार्य शिक्षकच करतात.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले.

गोदावरी आयएमआर..
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर) मध्ये शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.यावेळी प्रा. लीना पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील शिक्षकांचे महत्त्व आणि आधुनिक युगात नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले.

संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी संबोधित करताना सांगितले की, शिक्षक हा समाज घडवणारा मुख्य घटक असून विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक कौशल्ये व उत्तम संस्कार आत्मसात करून आदर्श नागरिक बनावे.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. स्मिता चौधरी यांनी शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले.

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालय..
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात शिक्षकांसाठी विविध गेम आयोजित करण्यात आले होते. त्यात सर्व शिक्षकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांविषयी त्यांचे मत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कविता देशमुख यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय थोडक्यात सांगितला. डॉ.नदीम शेख सर यांनीही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय थोडक्यात सांगितला. कु. ओजल जावळे हिने सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास महाविद्यालयाच्या अ‍ॅ डमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मीनल राणे, एन एस एस ऑफिसर प्रा. जयश्री कुलकर्णी, प्रा. कोमल भालेराव, ग्रंथपाल कविता भोरटके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, डॉ.उल्हास पाटील कृषि, कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी,अन्न व तंत्रज्ञान, डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी, डॉ.उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय, डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, येथेही शिक्षक दिन साजरा करण्यात आला.


 

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add