• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दोन लाखांचे मोबाईल चोरणारा अल्पवयीन २४ तासांत जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 22, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दोन लाखांचे मोबाईल चोरणारा अल्पवयीन २४ तासांत जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात एमआयडीसी पोलिसांनी एका मोठ्या घरफोडीचा २४ तासांच्या आत छडा लावला आहे. नशेमन कॉलनीतील तन्वीर मजहर पटेल यांच्या घरातून चोरलेले २ लाख रुपये किमतीचे २ ॲपल आयफोन आणि १ वन प्लस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

तन्वीर पटेल यांच्या घरात अज्ञात चोरट्याने दि. १८ मे २०२५ रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास प्रवेश करून मोबाईल चोरले होते. या घटनेनंतर दि. १९ मे रोजी पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यात वाढत्या मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दिलेल्या निर्देशानुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो. नि. संदीप पाटील यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. डीबी पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून, स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा केली, गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी फिर्यादींच्या घराजवळ एक अल्पवयीन मुलगा फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे तपास पथकाने शहरातील विविध भागांमध्ये शोध घेऊन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले दोन्ही ॲपल आयफोन आणि वन प्लस मोबाईल असे एकूण २ लाख रुपये किमतीचे फोन २४ तासांच्या आत हस्तगत करण्यात आले. या कामगिरीत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील पो. उ. नि. राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पो. हे. कॉ. रामकृष्ण पाटील, पो. कॉ. किरण पाटील, छगन तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकुर, योगेश बारी आणि योगेश घुगे यांचा मोलाचा वाटा होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. कॉ. रामकृष्ण पाटील हे करत आहेत.

Tags: Crime
Next Post
तापी नदीपात्रात जालनाच्या मामाभाच्याचा बुडून मृत्यू ! ; भुसावळ येथील घटना

तापी नदीपात्रात जालनाच्या मामाभाच्याचा बुडून मृत्यू ! ; भुसावळ येथील घटना

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add