• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तापी नदीपात्रात जालनाच्या मामाभाच्याचा बुडून मृत्यू ! ; भुसावळ येथील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
तापी नदीपात्रात जालनाच्या मामाभाच्याचा बुडून मृत्यू ! ; भुसावळ येथील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील पेंढारवाडा परिसरात देवाच्या कार्यक्रमानिमित्त जालना येथून मामाभाचे आले होते. बुधवारी दि. २१ मे रोजी सकाळी ८ वाजता राहुल नगर भागातील तापी नदीपात्रात हे मामा भाचे दोघे अंघोळीसाठी गेले असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडून मृत्युमुखी पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

रामराजे नंदलाल नातेकर (वय ५५) आणि आर्यन नितीन काळे (वय २१, दोन्ही रा. जालना) असे मयत मामा भाच्यांची नावे आहेत. रामराजे नातेकर यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. तर आर्यन काळे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. दोन्ही परिवार हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात.दरम्यान, भुसावळ येथील मामाजी टॉकीज परिसरातील पेंढारवाडा भागात रहिवासी संदीप रणधीर यांच्याकडे देवाचा कार्यक्रम असल्याने ते जालना शहरातून भुसावळ येथे आले होते.

दरम्यान, बुधवारी दि. २१ रोजी सकाळी भुसावळ शहरातील राहुल नगर भागातील देवीच्या मंदिराच्या परिसरातील तापी नदीपात्रात रामराजे नातेकर हे भाचा आर्यन काळे याला घेऊन अंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, पात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. नागरिकांनी त्यांना भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी आक्रोश केला. घटनेची भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
बॅटरी चोर २४ तासांत जेरबंद ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

बॅटरी चोर २४ तासांत जेरबंद ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group