• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बॅटरी चोर २४ तासांत जेरबंद ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 22, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बॅटरी चोर २४ तासांत जेरबंद ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात अजिंठा चौफुली येथील चौधरी बॅटरी ट्रेडिंग नावाच्या दुकानातून ४१ हजार रुपये किमतीच्या ४१ जुन्या बॅटऱ्या चोरी झाल्या होत्या. याप्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी चोरीचा २४ तासांत छडा लावत दोन संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी यांच्या चौधरी बॅटरी ट्रेडिंग दुकानाचे दि. १७ मे २०२५ रोजी मध्यरात्री लोखंडी शटर वाकवून अज्ञात चोरट्याने ४१ जुन्या बॅटऱ्या चोरल्या होत्या. या प्रकरणी १९ मे २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. संशयित आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनाचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी तेल्हारा, जि. अकोला येथून दोन संशयित आरोपींना जेरबंद केले.

पोलिसांनी दि. २० मे रोजी दुपारी १:४१ वाजता अजमदउल्ला अमानतउल्ला खान (वय २४, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि सैय्यद दानिश सैय्यद इस्माईल (वय २५, रा. घोडेगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या ३१ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ३० व्हीडी ६८७३) जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण ६,३१,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कारवाईत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे पो. उ. नि. राहुल तायडे, चंद्रकांत धनके, स. पो. उ. नि. दत्तात्रय बडगुजर, पो. ना. प्रदीप चौधरी, पो. को. सिद्धेश्वर डापकर, रतन गिते, योगेश बारी यांचा सहभाग होता. पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहेत.


 

Tags: Crime
Next Post
भुसावळच्या संतोष मराठे यांची खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड

भुसावळच्या संतोष मराठे यांची खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add