• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बॉक्सिंग प्रशिक्षकाचा अपघातात मृत्यु, जावई जखमी

भुसावळ तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
बॉक्सिंग प्रशिक्षकाचा अपघातात मृत्यु, जावई जखमी

भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील कंडारी गावातील नागसेन कॉलनीचे रहिवासी आणि प्रसिद्ध बॉक्सिंग प्रशिक्षक स्टीफन डेव्ह (वय ५५) यांचा नीलगायच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. १७ मे रोजी पहाटे चारच्या सुमारास जामनेर रोडवरील कुऱ्हे पानाच्या गावाच्या पुढे घडली. या अपघातात त्यांचे जावई अहिरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्टीफन डेव्ह यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. स्टीफन डेव्ह हे रेल्वे सेवेत कार्यरत होते. त्यांनी कारकिर्दीत अनेक तरुण खेळाडूंना बॉक्सिंगचे प्रशिक्षण देत राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक खेळाडूंनी महाराष्ट्राची शान वाढवली आहे. स्टीफन डेव्ह आणि त्यांचे जावई अहिरे बुलेट मोटारसायकल (क्रमांक एमएच १२ एसएच १७१६) वरून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दरम्यान, पानाच्या कुऱ्हे गावाजवळ अचानक नीलगायांचा कळप महामार्गावर आल्याने त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक झाली. या अपघातात डेव्ह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना स्थानिकांनी तत्काळ मदत करत त्यांना भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र स्टीफन डेव्ह यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जखमी जावयाला अधिक उपचारासाठी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे डेव्ह यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर नशिराबाद पोलीस स्टेशनला अपघाताच्या घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

Tags: accident
Next Post
कडब्याला भीषण आग ; शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

कडब्याला भीषण आग ; शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add