• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वे मालगाडी रुळावरून घसरल्याने सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
रेल्वे मालगाडी रुळावरून घसरल्याने सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

अमळनेर, (प्रतिनिधी) : भुसावळकडून नंदुरबारकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील एक मालगाडी अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ गुरूवारी १५ मे रोजी दुपारी २ वाजता रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.

भुसावळ कडून नंदुरबारकडे जाणारी रेल्वे मार्गावरील मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना गुरूवारी १५ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ घडली आहे. रेल्वेचे लोको पायलट आणि गार्ड पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र, मालगाडीचे काही डब्बे रुळावरून खाली उतरल्याने आजूबाजूचे रेल्वे ट्रॅकही खराब झाले आहेत. यामुळे सुरत-भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी रेल्वेच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अमळनेर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावरच ही घटना घडल्यामुळे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. तथापि, रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघातासंदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मालगाडी नेमकी कोणत्या कारणामुळे रुळावरून घसरली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावरच रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे.

Tags: #relwayaccidentAmalner
Next Post
देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या संभाजीनगरच्या तरुणाला अटक

देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या संभाजीनगरच्या तरुणाला अटक

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add