• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

व्यवस्था परिवर्तन हा आंबेडकरी चळवळीचा गाभा.. – प्रा.डॉ.सत्यजीत साळवे

संविधान जागर समिती आयोजित अभिवादन सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 7, 2021
in सामाजिक
0
व्यवस्था परिवर्तन हा आंबेडकरी चळवळीचा गाभा.. – प्रा.डॉ.सत्यजीत साळवे

जळगाव, दि. 07 – निद्रिस्त समाज हा विवेकशून्य असतो, यामुळे विचार मंदावतात. व्यवस्था परिवर्तन हा आंबेडकरी चळवळीचा गाभा आहे. असे विचार प्रा.डॉ. सत्यजीत साळवे यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान जागर समितीच्या वतीने सोमवारी जळगावात आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांचे शस्त्र दिले आहे. पण आपण गतीहिन होत चालल्यामुळे चळवळीचा पाया कमकुवत होण्याचा धोका समोर आहे. असे परखड विचार प्रा.डॉ.सत्यजीत साळवे यांनी व्यक्त करून सर्व समाज घटकांनी एकसंघ होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या दिशादर्शक मार्गावरून वाटचाल केली पाहिजे असे आवाहन केले.

संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी अध्यक्षीय भाषणातून देशासमोर शक्ती चा वाढता धोका असल्याचे सांगून सर्वांना समान न्याय हक्काचा अधिकार देणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हाच आपल्याला तारणारा आहे असे सांगितले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनीही आपले विचार व्यक्त केले.

यावेळी आमदार सुरेश भोळे, भंते सुगतवांस महाथेरो, भंते संघरत्न थेरो, नगरसेवक सुरेश सोनवणे, अमोल कोल्हे, दिलीप सपकाळे, प्रा.वळवी, राजू मोरे, चंदन बिऱ्हाडे, वाल्मीक सपकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत ससाणे यांनी केले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार रमेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला ऍड. राजेश गोयर, बाबुराव वाघ, जयपाल धुरंधर, नीलेश बोरा, युवराज सुरवाडे, हरीश कुमावत, नीलू इंगळे, रंजना तायडे, भारती म्हस्के, एॅड.अभिजित रंधे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधान सोनवणे, महेंद्र केदार, आकाश सपकाळे, अभिलाष वाघ, भारत सोनवणे, मिलिंद तायडे, जगदीश सपकाळे आदींनी परिश्रम घेतले.


 

Next Post
परिवर्तन तर्फे आठ दिवसीय ‘भावांजली महोत्सवा’चे आयोजन

परिवर्तन तर्फे आठ दिवसीय 'भावांजली महोत्सवा'चे आयोजन

ताज्या बातम्या

‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन

January 25, 2026
तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल
खान्देश

तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल

January 24, 2026
माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या
गुन्हे

माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या

January 24, 2026
खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ
खान्देश

खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ

January 23, 2026
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण
जळगाव जिल्हा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण

January 23, 2026
गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड
खान्देश

गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड

January 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group