• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 29, 2026
in गुन्हे
0
दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त

जळगाव, (प्रतिनिधी) : एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दोन मोटार सायकलींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून एका २४ वर्षीय चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै रोजी रात्री ११.३० ते दि. २७ जुलै रोजी सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास फिर्यादी समीर खान नईम खान (रा. दत्त नगर मेहरुण, रवी किराणाजवळ, जळगाव) आणि साक्षीदार फारुख इकबाल बागवान (रा. शेरा चौक, जळगाव) यांच्या राहत्या घरासमोरून लावलेल्या मोटार सायकली अज्ञात चोरट्याने लांबविल्या होत्या. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. रमेश चौधरी, प्रदीप चौधरी, पो.कॉ. नितीन ठाकूर, पो.कॉ. गणेश ठाकरे, पो.कॉ. किरण पाटील, पो.कॉ. राहुल घेटे, पो.कॉ. योगेश घुगे आणि पो.कॉ. सुभाष सावळे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

​तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांमार्फत संशयिताची ओळख पटवली. २८ जुलै रोजी तांबापुरा मेहरुण भागात सापळा रचून संशयित आरोपी साहील मोहम्मद तडवी (वय २३, रा. तांबापुरा मच्छी बाजार, जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने दोन्ही मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास तात्काळ अटक करण्यात आली.

​अटक करण्यात आलेल्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. प्रदीप चौधरी करत आहेत. ​सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Tags: #midcpoliceJalgaonPolice

ताज्या बातम्या

दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त
गुन्हे

दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त

July 29, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न
शैक्षणिक

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 29, 2026
जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

July 28, 2026
न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 28, 2026
परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मनोरंजन

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add