• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

सुमारे १०० माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 29, 2026
in शैक्षणिक
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचलित, स्वायत्त दर्जा प्राप्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील अलुम्नी असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेला ’अलुम्नी मीट २०२६’ हा ऑनलाइन स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. देश-विदेशातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सुमारे १०० माजी विद्यार्थ्यांनी गुगल मीटच्या माध्यमातून सहभाग नोंदवत महाविद्यालयाशी असलेले भावनिक नाते पुन्हा एकदा दृढ केले.

कार्यक्रमाची सुरुवात डीन (माजी विद्यार्थी आणि आंतरराष्ट्रीय संबंध) प्रा. प्रशांत शिंपी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करत संस्था आणि माजी विद्यार्थी यांच्यातील सशक्त नातेसंबंध अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल, राष्ट्रीय स्तरावरील यश, उत्कृष्ट प्लेसमेंट उपक्रम आणि भविष्यातील दिशा याविषयी माहिती दिली.

तसेच माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, इंटर्नशिप, रोजगाराच्या संधी, उद्योग-शैक्षणिक सहकार्य आणि प्लेसमेंटसाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. रेश्मा अत्तरदे यांनी केले. त्यांनी विविध बॅचमधील माजी विद्यार्थ्यांना संवादासाठी आमंत्रित करत त्यांच्या व्यावसायिक यशाचा प्रवास आणि महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देण्याची संधी उपलब्ध करून दिली.

यावेळी ऋषिकेश ठाकूर, रिद्धी कर्णावत, जेमिष लखानी, तुषार जैन, निखिल मंडाले, सागर काळे, राहुल सिंग, रोहित सिंग, हर्षल परदेशी, स्वप्निल ठाकूर, किरण भावसार, दर्शन भट, धीरज, आलोक, नरेंद्र महाजन, उन्मेष पाटील, उबेदुल्ला, रोशनी पाटील, तुषार धांडे, जगदीश अटोळे, रुपेश कुमावत, कपिल पारसे, मयूर कासट, सुरज, अभिजीत पवार, निखिल कोठावदे आणि गणेश राज यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्या, प्रतिष्ठित संस्था तसेच स्वतःच्या उद्योग-व्यवसायातील यशस्वी प्रवास, करिअरमधील अनुभव, उद्योग क्षेत्रातील संधी आणि आव्हाने याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.

प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी समारोपप्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानत संस्थेच्या प्रगतीसाठी करिअर मार्गदर्शन, इंटर्नशिप, प्लेसमेंट, उद्योग-शैक्षणिक सहकार्य, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता विकासासाठी सातत्याने सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये नियमित सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेरणादायी यशोगाथा, जुन्या आठवणींना दिलेला उजाळा आणि संस्थेबद्दल व्यक्त झालेला अभिमान यामुळे ’अलुम्नी मीट २०२६’ हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक करून माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


 

Next Post
दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त

दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त

ताज्या बातम्या

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद
खान्देश

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add