• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबईतील बालहृदयरोग तज्ज्ञांच्या सहकार्याने कॅथलॅबमध्ये चिरफाडविरहित उपचार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 28, 2026
in आरोग्य
0
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील महादेव हॉस्पिटलमध्ये दोन बालकांच्या हृदयाला असलेले छिद्र (जन्मजात हदयदोष — एएसडी/पीडीए/व्हीएसडी प्रकारातील योग्य रुग्णासाठी) अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर पद्धतीने यशस्वीरित्या बंद करण्यात आले. डॉ. वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील पेडीयाट्रीक कॉर्डीओलॉजीस्ट तज्ज्ञांच्या सहकार्याने चिरफाडविरहित यशस्वी उपचार करण्यात आले.

ही शस्त्रक्रिया महादेव हॉस्पीटलच्या अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये पार पडली असून रुग्णावर कोणतीही मोठी चिरफाड न करता, रक्तवाहिनीद्वारे विशेष डिव्हाइस बसवून हृदयातील छिद्र बंद करण्यात आले. यावेळी महादेव हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील (डीएम कॉर्डीओलॉजी) यांच्या नेतृत्वाखाली अपोलो हॉस्पिटल, मुंबई येथील पेडीयाट्रीक कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. भूषण चौहान, डॉ. धवल खडके तसेच डॉ. झीशान सय्यद (कॉर्डीओलॉजी निवासी वैद्यकिय अधिकारी ) यांनी महत्त्वपूर्ण कामगीरी आव्हान स्विकारत पुर्ण केली.

या प्रक्रियेत कॅथलॅब टेक्निशियन मोहम्मद सिद्दिकी यांनीही तांत्रिक जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडत सहाकार्य केले. याबाबत बोलतांना डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले की, जन्मजात हृदयातील छिद्राची वेळेत तपासणी व उपचार केल्यास मुलांचे आयुष्य पूर्णपणे निरोगी राहू शकते. आधुनिक डीव्हाईस क्लोजर तंत्रज्ञानामुळे छाती उघडण्याची गरज भासत नाही, रक्तस्राव कमी होतो, रुग्ण लवकर बरा होतो आणि अल्पावधीत घरी परतू शकतो.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जळगाव व उत्तर महाराष्ट्रातील बालहृदयरुग्णांना आता अशा अत्याधुनिक उपचारांसाठी मुंबईसारख्या महानगरात जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, महादेव हॉस्पिटलमध्येच उच्च दर्जाची पेडीयाट्रीक कॉर्डीओलॉजी सेवा उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Next Post
न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद
खान्देश

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद

September 12, 2026
भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने सपासप वार करून हत्या; अल्पवयीन संशयित ताब्यात
खान्देश

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने सपासप वार करून हत्या; अल्पवयीन संशयित ताब्यात

September 12, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add