• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मिनाताई ठाकरे मार्केट गोळीबार प्रकरणी सहा सराईत गुन्हेगारांना अटक

रामानंद नगर पोलिसांची कामगिरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 1, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मिनाताई ठाकरे मार्केट गोळीबार प्रकरणी सहा सराईत गुन्हेगारांना अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ मीनाताई ठाकरे मार्केट येथे गुरूवारी झालेल्या गोळीबार प्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत.

महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा. पिंप्राळा) हा मित्र भूषण अहिरे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेंट जोसेफ शाळेजवळील मीनाताई ठाकरे मार्केट येथे मित्रांसह आला होता. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याने आरोपींनी कोयते आणि गावठी कट्ट्यासह घटनास्थळी येऊन फिर्यादीवर गोळीबार केला. या गोळीबारात महेंद्र सपकाळे याच्या कमरेखाली गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अवघ्या काही दिवसात ६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये विशाल भिका कोळी (पिस्तूलासह), अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी, धिरज उर्फ वैभव उर्फ गोलु कोळी, सागर अरुण भोई उर्फ जाड्या भोल्या, नितेश मिलिंद जाधव आणि गिरिष किशोर घुगे यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपी गिरिष घुगे याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. याशिवाय घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस आणि दोन रिकामे काडतुसांचे खाली पुंगळ्या तसेच एक कोयता देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलिसांनी आरोपींचा मागील गुन्हेगारीची माहिती दिली आहे. मुख्य आरोपी विशाल कोळी याच्यावर जळगाव शहर आणि रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये एकूण ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. तसेच, आरोपी अक्षय धोबी याच्यावर ८ गुन्हे दाखल असून त्याच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. आरोपी नितेश जाधव याच्याविरुद्ध १५ गुन्हे दाखल असून त्याच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संदीप वाघ, पोउपनि प्रदिप बोरुडे आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोरुडे करत आहे.

 


Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
शेअर ट्रेंडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक

शेअर ट्रेंडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक

ताज्या बातम्या

जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर
गुन्हे

जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर

July 27, 2025
जळगावात गणेशोत्सवासाठी लगबग: सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची पहिली नियोजन बैठक संपन्न
जळगाव जिल्हा

जळगावात गणेशोत्सवासाठी लगबग: सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची पहिली नियोजन बैठक संपन्न

July 27, 2025
फरारी रोड रॉबरीचा आरोपी अखेर जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
गुन्हे

फरारी रोड रॉबरीचा आरोपी अखेर जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

July 27, 2025
जैन इरिगेशनची दमदार कामगिरी : पहिल्या तिमाहीत उत्पन्न आणि नफ्यात विक्रमी वाढ!
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनची दमदार कामगिरी : पहिल्या तिमाहीत उत्पन्न आणि नफ्यात विक्रमी वाढ!

July 27, 2025
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशन जळगाव परिमंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर
जळगाव जिल्हा

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशन जळगाव परिमंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

July 25, 2025
गांधी विचारात आनंदी जीवनाची ताकद : गिरीश कुळकर्णी
जळगाव जिल्हा

गांधी विचारात आनंदी जीवनाची ताकद : गिरीश कुळकर्णी

July 25, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group