• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेअर ट्रेंडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव सायबर पोलीस स्टेशनची कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 1, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शेअर ट्रेंडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध मोहीम राबवत सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ४ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणात कांजीभाई भिकाभाई यादव (वय ४२, वेरावल, गुजरात) याला अटक झाली आहे. दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात तक्रारदाराला या कालावधीत मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून फसवले गेले. आरोपींनी स्वतःला मालविया, आदित्य जैन, विजय कुमार अशी नावे सांगत फोन आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. त्यांनी “Raise-Pyramid एलिट” नावाच्या काल्पनिक योजनेत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर, गुंतवणूकदारांना मिळालेल्या नफ्यापैकी २० टक्के रक्कम कथित धर्मादाय संस्थांना दान म्हणून द्यावी लागेल, असे खोटे सांगून तब्बल ५३.६५ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. मात्र, नंतर कोणतीही रक्कम परत न करता तक्रारदारांची फसवणूक करण्यात आली.

तपासादरम्यान असे उघड झाले की, संशयित आरोपीने एक बनावट कंपनी उभारली होती आणि बँक खात्यांद्वारे मिळालेली रक्कम “देणगी” म्हणून दाखवून समाजकल्याणाच्या नावाखाली खर्च केल्याचा दावा केला. आतापर्यंत या प्रकरणात ७ संशयितांचा समावेश असून, तीन जणांना अटक झाली आहे. तसेच, बँक खात्यांचे विश्लेषण करून तक्रारदाराला ११.८३ लाख रुपये परत मिळवून देण्यात आले आहेत. कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश गोराडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार दिलीप चिंचोले, हरून पिंजारी अशांनी केली आहे.

Next Post
२४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू ; चोपडा तालुक्यातील घटना

२४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू ; चोपडा तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add