• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चहाच्या टपरीला गॅसचा भडका उडाल्याने लागली आग ; एक जखमी

पाचोरा शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
चहाच्या टपरीला गॅसचा भडका उडाल्याने लागली आग ; एक जखमी

पाचोरा, (प्रतिनिधी) : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजेंद्र प्रसाद रोडवरील चहाच्या टपरीला गॅसचा भडका उडाल्याने अचानक आग लागली. ही घटना सोमवारी दि. ७ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. गॅस सिलिंडर जोडत असताना अचानक भडका उडाल्याने ही आग लागली असून, यात एक इसम भाजला गेला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून काही काळ धावपळ उडाली होती.

देशमुखवाडी येथील ७० वर्षीय वृद्ध महिला दगुबाई विठ्ठल महाजन या राजेंद्र प्रसाद रोडवर चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करतात. सोमवारी चहाचे दुकान सुरु होते. त्याचवेळी त्यांनी गॅस सिलिंडर जोडण्यासाठी समोरच राहणाऱ्या दिपक चतुर्भुज शर्मा यांना बोलावले. गॅस जोडणीच्या प्रक्रियेदरम्यान अचानक गॅसचा भडका उडाल्याने टपरीला आग लागली.

दगुबाई महाजन प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून दूर गेल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र, दिपक शर्मा यांचा डावा हात व गाल भाजला असून, त्यांना तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी हलवण्यात आले. आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्परतेने मदत करत आग आटोक्यात आणली. दगुबाई यांची चहाची टपरी पूर्णतः जळून खाक झाली आहे, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ धावपळ उडाली होती.

Next Post
विवाहितेने मुलीच्या झोक्याला गळफास लावून घेत केली आत्महत्या

विवाहितेने मुलीच्या झोक्याला गळफास लावून घेत केली आत्महत्या

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add