• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा कारागृहात संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात

देशभक्तीपर गीतांनी बंदी झाले भावुक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 27, 2025
in जळगाव जिल्हा
0
जिल्हा कारागृहात संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : कारागृहातील बंदी यांचा भावनिक विकास होऊन सकारात्मक विचारसरणी रुजावी, यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते. समाजविघातक प्रवृत्तीमुळे कारागृहात गेलेल्या बंदींचे समुपदेशन देशभक्तिपर गाण्यांच्या माध्यमातून व्हावे, तसेच संगीताच्या प्रभावी माध्यमातून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर नेऊन त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागवावी, या उद्देशाने “जीवन गाणे गातच जावे” या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या वतीने जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आले.

जिल्हा कारागृहाच्या कला भवनात झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील होते. जिल्हा कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. जे. चव्हाण, तुरुंग अधिकारी राकेश देवरे, सुभेदार सुभाष खरे, खांडरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वर शुभम ग्रुपच्या प्रतीथयश कलाकार कपिल घुगे आणि सहकारी यांच्या सादरीकरणाने झाली. “इतनी शक्ति हमें देना दाता” या प्रार्थनेसह कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर विविध देशभक्तिपर गीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. बंदी बांधवांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद दिली.

“भारत मातेच्या जयघोषाने” संपूर्ण कारागृह दुमदुमून गेले. विशेष म्हणजे, कारागृहात बंदीवास भोगत असलेल्या दोन बंदिवान बांधवांनीही भक्तिगीत व देशभक्तिपर गीते सादर केली. जळगावचे शाहीर विनोद ढगे आणि त्यांची “दिशा कला पथक” संस्था यांच्यातर्फे पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून भारुड सादर करण्यात आले. व्यसनमुक्ती व सकारात्मक जीवनदृष्टी यावर भर देणाऱ्या भारुडाने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. स्वर शुभम ग्रुप व दिशा कला पथकाच्या १५ कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमाची सांगता स्वर शुभम ग्रुपच्या कलावंत वर्षा पाटील यांच्या “है मालिक, तेरे बंदे हम” या गाण्याने झाली. समन्वयक विनोद ढगे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा संस्थेचे सचिन महाजन, मोहित पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, विनोद पाटील, आकाश भावसार, मनोज जैन यांनी मेहनत घेतली.

Next Post
मुक्ताईनगर चौपदरीकरणाच्या कामात त्रुटी ; आ. खडसेंनी मांडला लक्षवेधी सवाल !

मुक्ताईनगर चौपदरीकरणाच्या कामात त्रुटी ; आ. खडसेंनी मांडला लक्षवेधी सवाल !

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
खान्देश

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add