• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनचा पुरुष संघ अजिंक्य अंतिम सामन्यात रिझर्व बँक संघावर मात

आंतरसंस्था अजिंक्यपद कॅरम स्पर्धा पुडूचेरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 23, 2021
in क्रिडा
0
जैन इरिगेशनचा पुरुष संघ अजिंक्य अंतिम सामन्यात रिझर्व बँक संघावर मात

जळगाव दि.22 प्रतिनिधी – पुडूचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरसंस्था अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रिझर्व बँक ऑफ इंडिया संघावर ०२-१ असा विजय प्राप्त करून जैन इरिगेशनच्या पुरूष संघाने आपले पहिले राष्ट्रीय सांघिक विजेतेपद प्राप्त केले.

याआधी जैन इरिगेशनच्या पुरूष संघाला तीन वेळा आणि महिला संघाला एकदा विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. यावेळी मात्र जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने जबरदस्त कामगिरी करताना शेवटपर्यंत एकही सामना न गमावता विजेतेपदास गवसणी घातली. जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रिपणकर याने आपले सहा पैकी सहा सामने जिंकून सर्वोत्तम कामगिरी केली. पंकज पवार याने दोन ओपन टू फिनिश केले आणि अंतिम सामन्याच्या निर्णायक लढतील योगेश धोंगडेने शेवटच्या बोर्डावर प्रतीस्पर्धा खेळाडू जहीर पाशाची १० गुणाची आघाडी असताना ११ गुणासह बोर्ड आणि सामना जिंकून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. उपांत्य सामन्यात जैन इरिगेशन संघाने सिव्हिल सर्विसेस संघावर ३-० ने विजय प्राप्त केला. अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रिपणकरने रिझर्व बँकेचा व्ही आकाशला २५-० आणि २५-० असा पराभव करून विजयी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात मात्र जैन इरिगेशनच्या पंकज पवार हा रिझर्व बँकेच्या विश्वविजेता व सध्याच्या राष्ट्रीय विजेता खेळाडू प्रशांत मोरे कडून १२-२२, २०-१९ आणि ११-२५ असा पराभूत झाला. एकेरीच्या तिसऱ्या आणि निर्णायक लढतील योगेश धोंगडेने जहीर पासा विरुद्ध पहिला सेट २५-१३ जिंकला दुसरा सेट मध्ये योगेश धोंगडेची शेवटच्या बोर्ड पर्यंत आघाडी असतानासुद्धा जहिर पाशाने अंतिम बोर्ड मध्ये ओपन टू फिनिसची नोंद करून दुसरा सेट जिंकून सामन्यात रंगत आणली.

तिसऱ्या व निर्णायक सेट मध्ये योगेश धोंगडे पहिले दोन्ही बोर्ड जिंकून ११ गुणांची आघाडी घेतली परंतु त्यानंतर जहीर पाशाने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत अंतिम बोर्ड बाकी असताना १० गुणांची मोठी आघाडी घेतली होती परंतु योगेश धोंगडेने सामन्याच्या शेवटच्या बोर्डावर स्वतःची सर्विस वर ११ गुण घेत सामना जिंकून संघास ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. जैन इरिगेशनच्या विजेतापद पटकाविल्या बद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, जैन स्पोर्टस अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे यांनी केले .

कॅरम स्पर्धेतील यश अभिमानास्पद– अतुल जैन

राष्ट्रीय पातळीवरील आंतर संस्था कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनचा पुरुषांचा कॅरम संघ अंतिम विजेता ठरला. ही निश्चितच अभिमानस्पद बाब असून संघातील सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी केले आहे.


 

Next Post
मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे २५ नोव्हेंबरपासून आयोजन

मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे २५ नोव्हेंबरपासून आयोजन

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add