• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे २५ नोव्हेंबरपासून आयोजन

नामांकित कीर्तनकारांचे विचार ऐकण्याची भाविकांना पर्वणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 23, 2021
in धार्मिक
0
मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे २५ नोव्हेंबरपासून आयोजन

जळगाव, दि. 23 – येथील मेहरुण भागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा (संगीत) चे दि.२५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे २१ वे वर्षे आहे. जळगाववासियांनी या किर्तन सप्ताह तथा भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह सामाजिक संस्थांनी केले आहे.

जीवनात सर्वत्र चैतन्य यावे, दु:खी कष्टी वाटणार्‍या मनाचा कीर्तन व प्रवचन श्रवणाने अध्यात्मिक विकास होऊन मनातील दुर्बलता नष्ट व्हावी यासाठी हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य, प्रभागातील नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांनी दिली.

हरिनाम संकीर्तन सप्ताह उत्सवाचा प्रारंभ २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दररोज सकाळी ५ ते ६ या वेळेत काकड आरती, दुपारी १ ते ४ संगीतमय भागवत कथेचे आयोजन, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी श्रीमद् भागवत ग्रंथ पुजन माजी महापौर नितीन लढढा आणि माजी नगरसेविका अलका लढढा यांच्या हस्ते होईल. सर्व कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर चौक कै. सुरेशमामा नाईक यांच्या घराजवळ मेहरुण भागामध्ये होणार आहे.

श्रीमद् भागवत कथा सुरवाडा येथील तुकाराम महाराज देवस्थान येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर हे सांगणार आहेत. ते शेवटच्या दिवशी २ डिसेंबर रोजी रात्री काल्याचे किर्तनदेखील करणार आहे.

सप्ताहाची सांगता २ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत श्रीमद् भागवत कथा पूजन मान्यवरांच्या हस्ते करून केली जाणार आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, उद्योजक अशोक जैन, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह आमदार, खासदार व महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता श्रीमद् भागवत कथेची दिंडी मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणुकीनंतर भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीराम तरुण मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, जय दुर्गा ग्रुप, साई दत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी तसेच मेहरुणचे ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Next Post
लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी

लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
जळगाव जिल्हा

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर

June 2, 2023
उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद
कृषी

उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

June 1, 2023
महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !
आरोग्य

महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !

June 1, 2023
निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या
जळगाव जिल्हा

निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या

May 31, 2023
कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन
कृषी

कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन

May 27, 2023
जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

May 27, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.