• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सासरच्या जाचाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या !

घातापाताचा माहेरच्या मंडळींना संशय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
सासरच्या जाचाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या !

जळगाव, (प्रतिनिधी) : दारू पिऊन घरी येवून मारहाण करणारा पती आणि सासरच्या मंडळींच्या जांचाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. दरम्यान, मुलीला गळफास देवून तिला ठार मारण्यात आले आहे असा आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विवाहितेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

सोनी चेतन चव्हाण (वय २२ रा. धानवड ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. मयत विवाहितेच्या पश्चात सार्थक (वय-३) प्रथमेश (वय-५) ही दोन मुलं, आई, वडील, एक भाऊ, लहान बहिण असा परिवार आहे. तालुक्यातील धानवड येथे सोनी चव्हाण ही विवाहिता आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. सोमवारी १७ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सोनी हिने घरी कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर विवाहितेच्या सासरकडील मंडळींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विन देवचे यांनी तपासून मयत घोषीत केले.

दरम्यान विवाहितेच्या आई व वडील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवन आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. दरम्यान मुलीला ठार मारणाऱ्या विवाहितेच्या पतीसह तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी माहेरच्या मंडळींनी केली आहे. यास घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी मीनल करनवाल यांची नियुक्ती

जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी मीनल करनवाल यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add