• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात होळीनिमित्त वृक्ष संवर्धनाचा संकल्प

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात होळीनिमित्त वृक्ष संवर्धनाचा संकल्प

जळगाव, (प्रतिनिधी) : होळी सण म्हटला की, झाड वृक्षांची तोड केली जाते. मात्र मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मुलांनी अनोखी होळी साजरी केली.

दरम्यान विद्यार्थ्यांनी परिसरातील स्वच्छता व झाडांच्या संवर्धनास प्राधान्य दिले आहे. शाळा परिसरातील कचरा एकत्र करीत त्याला अग्नी देत आपल्यातील दुर्गुणांची होळी करण्याची शपथ घेतली. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी होळीची पूजा करीत झाड संवर्धनाचा निर्धार केला.

शाळेतील मुलांनी यावर्षी साजरी केलेली होळी आदर्शवत ठरली आहे. समाजाला जागृत करून बदलत्या परिस्थितीनुसार अशाप्रकारे होळी साजरी केली पाहिजे, यातून समाज आणि निसर्ग हितही जपले जाईल, याचे उदाहरण देण्यात आले असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन करण्याची शपथ शिक्षिका रूपाली आव्हाड यांनी दिली. मुलांच्या या आगळ्यावेगळ्या होळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. होळीचे महत्त्व कविता सानप यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कोळी यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० कोटी अनुदान मंजूर

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० कोटी अनुदान मंजूर

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add