• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतात फवारणी करताना शेतकऱ्याला विषबाधा ; उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 7, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतात फवारणी करताना शेतकऱ्याला विषबाधा ; उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील धामणगाव शिवारातील शेतात फवारणी करतांना विषबाधा झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना प्रौढ शेतकऱ्याचा उपचारादरम्यान गुरूवारी दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

किशोर अभिमन तायडे (वय ५२ रा. धामणगाव ता.जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई मिराबाई, पत्नी बेबाबाई, ललित आणि जयवंत ही दोन मुले, भाऊ राजू असा परिवार आहे. धामणगावात किशोर तायडे हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते.

सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ते शेतात पिकांवर फवारणी करत असतांना त्यांना विषबाधा झाली. या विषबाधामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालविली. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केला. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Next Post
बिबट्याचा धुमाकूळ सुरूच ; चाळीसगाव तालुक्यात वासराचा पाडला फडशा

बिबट्याचा धुमाकूळ सुरूच ; चाळीसगाव तालुक्यात वासराचा पाडला फडशा

ताज्या बातम्या

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add