• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बिबट्याचा धुमाकूळ सुरूच ; चाळीसगाव तालुक्यात वासराचा पाडला फडशा

टेकवाडे खुर्द शिवारात घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 7, 2025
in जळगाव जिल्हा
0
बिबट्याचा धुमाकूळ सुरूच ; चाळीसगाव तालुक्यात वासराचा पाडला फडशा

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्या जेरबंद केले असले, तरी काही ठिकाणी अद्यापही इतर बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास एका बिबट्याने टेकवाडे खुर्द शेत शिवारातील वासराचा फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

दिगंबर भानुदास गोसावी (वय ३८, रा.टेकवाडे खुर्द ता. चाळीसगाव) या शेतकऱ्यांच्या शेत शिवारात ही घटना घडली आहे. त्यांचे शेत कजबे बहाळ ऋषींपांथा शिवारात गिरणा खोऱ्यात नाल्यालागत आहे. त्यांच्या मालकीच्या गट नंबर ६०६ बहाळ शिवारातील शेतात शुक्रवारी सकाळी ते गेले असता त्यांना बिबट्याचे पावलांचे ठसे दिसले. तसेच वासराचा फडशा पाडल्याचे दिसून आले.

या घटनेमुळे तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. वनविभागाकडून दुपारी पंचनामा करण्यात आला आहे. या बिबट्यासोबत काही बछडे असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बिबट्या बहाळ गुढे, बहाळ, जीवार्डी तसेच वाडे, गोंडगाव, नावरे या शिवारात सध्या अनेकांना दिसत आहे. गोंडगाव शिवारात ३ दिवसापूर्वी असल्याचं एका घटनेत २ वासरांना बिबट्याने कंठस्नान घातले. दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करावा, आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशीही मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Next Post
देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले.. – यु. व्ही. राव

देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले.. - यु. व्ही. राव

ताज्या बातम्या

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add