• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ऑटो रिक्षाचालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील यांची माहिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 3, 2021
in जळगाव जिल्हा
0
ऑटो रिक्षाचालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक

जळगाव, दि. 03 (जिमाका) – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांच्याकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे, अशा सर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे भाडे आकारणे (घेणे) बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक परवानाधारक ऑटो रिक्षाला मोटर वाहन नियमान्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधणकारक असून ते सुस्थितीत असणे देखील बंधनकारक आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य आहे. ही बाब कायदेशिर आहे. परंतु उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे. त्यानुसार रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात. ही बाब रिक्षा परवान्याचे उल्लंघन करणारी आहे.

सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांनी 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑटोरिक्षा फेअरमीटर प्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटर प्रमाणे भाडे घ्यावे अन्यथा अशाप्रकारचे पालन न करणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध मोटार वाहन कायाद्यातील तरतुदीनुसार परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

जळगाव शहरात ऑटो रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील, तर नागरिकांनी अशा ऑटो रिक्षा चालकाविरुद्ध उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2261819 किंवा mh19@mahatranscom.in या संकेतस्थळावर तक्रार करावी. त्यानुसार संबंधित परवाना धारकाविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पाटील यांनी म्हटले आहे.


 

Next Post
स्वर्गीय निकम यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त सहृदय मदतीचा हात

स्वर्गीय निकम यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त सहृदय मदतीचा हात

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add