• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तीन हजारांची लाज घेताना तलाठ्यावर कारवाई

जळगाव एसीबीची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 7, 2025
in गुन्हे
0
तीन हजारांची लाज घेताना तलाठ्यावर कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : सातबारा उताऱ्यावर आई व भावाचे नाव लावण्यासाठी तलाठ्याला ३ हजार रुपये लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुसूंबा येथे रंगेहाथ अटक केली आहे. ५ हजार रुपयांची लाच तलाठ्याने मागितली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

२६ वर्षीय तक्रारदार यांनी त्यांचे आई व भावाचे नाव सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत तलाठी नितीन शेषराव भोई (वय ३१ वर्षे) यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी आज दि. ७ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता तलाठी नितीन भोई यांनी सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी प्रथम ५ हजार, नंतर ४ हजार रुपये व तडजोडअंती ३ हजार रुपयाची लाचेची मागणी केली.

यावेळी तलाठी नितीन भोई आज दि. ७ जानेवारी रोजी ३ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदरची कारवाई हि पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, फौजदार सुरेश पाटील, पोना बाळू मराठे, पोकॉ अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे.

Tags: #corruption#jalgaon #maharashtraCrime
Next Post
पत्नीने पोलीस पतीची केली भावांच्या मदतीने हत्या !

पत्नीने पोलीस पतीची केली भावांच्या मदतीने हत्या !

ताज्या बातम्या

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add