• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पत्नीने पोलीस पतीची केली भावांच्या मदतीने हत्या !

अनैतिक संबंधात ठरला होता अडथळा,

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 8, 2025
in गुन्हे
0
पत्नीने पोलीस पतीची केली भावांच्या मदतीने हत्या !

अमळनेर (प्रतिनिधी) : विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने मामेभावासोबत कट रचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. विशेष म्हणजे मयत पती हे रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे रेल्वे पोलीस स्टेशनला कार्यरत होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

पोलीस कर्मचारी विजय चव्हाण (रा.सुभाष चौक, अमळनेर) हा पनवेल रेल्वे पोलिसात कार्यरत होता. त्याच्या पत्नीचे मामेभावासोबत विवाहबाह्य सबंध होते. त्यात ते अडसर ठरत असल्याने त्याची हत्या करण्याची योजना त्याची पत्नी व तिचा प्रियकर यांनी आखली होती. विजय चव्हाण हे घनसोली येथे वास्तव्यास होते. दि. ३१ डिसेंबर मंगळवारी त्यांना साप्ताहिक सुटी होती. त्याच रात्री त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्येनंतर अपघाताचा बनाव करण्यासाठी दि. १ जानेवारी रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह रबाळा ते घणसोली रेल्वे मार्गावर ठाण्यावरून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या लोकल रेल्वे समोर फेकण्यात आला होता. मात्र हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आल्याने त्यांनी गाडी थांबवत याबाबत रेल्वे व वाशी पोलिसांना माहिती दिली.

त्यावरून मारेकऱ्यांचा तपास सुरू करण्यात आला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पोलिसाची हत्या झाल्याने संपूर्ण पोलीस दल कामाला लागले होते. हत्या कोणी केली व का केली हे स्पष्ट होत नव्हते. मात्र मयत विजय चव्हाण यांच्या ‘गुगल पे’ वरून अंडाभुर्जी हातगाडीवर २४ रुपयांचे ऑन लाईन पेमेंट केले असल्याचे पोलिसांचे लक्षात आले. त्यांनी हातगाडीवर सीसीटीव्हीचा तपास केला असता मयत विजय चव्हाण सोबत त्याचा मेव्हणा असल्याचे दिसून आले होते. त्याचा मेव्हणा व पत्नीचा मामेभाऊ याने दारू पाजली. पिल्यानंतर अंडा भुर्जी खाण्यासाठी गेले होते. त्यावरून मेव्हण्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनेचा उलगडा पोलिसांना केला. विवाहबाह्य सबंधातून रेल्वे पोलीस विजय चव्हाण यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.

 


 

Tags: Crime
Next Post
मानराज कार शोरूमला आग ; सोलर पॅनल पेटले

मानराज कार शोरूमला आग ; सोलर पॅनल पेटले

ताज्या बातम्या

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add