• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात विविध उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 8, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

जळगाव, प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावच्या न्यूरोफिजिओथेरपी विभागातर्फे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगाव येथे जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांच्या विशेष क्षमतांचा स्वीकार, त्यांचा सन्मान आणि समाजातील समावेशकतेचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात यावर्षीच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि एकजुटीने या संकल्पनेचे स्पष्टीकरण जनजागृतीपर भाषणाने झाली यात सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांकडे केवळ त्यांच्या अडचणींच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांना वाव देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. उपक्रमात उडान केंद्रातील मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मुलांसाठी चित्रांना रंग भरणे, कोडी सोडवणे, ठोकळ्यांच्या साहाय्याने खेळ यांसह सूक्ष्म हालचालींना चालना देणारे विविध मनोरंजक उपक्रम घेण्यात आले.

उपक्रमांमुळे सर्जनशीलता व कार्यक्षमतेला प्रोत्साहन मिळाले.यावेळी सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी लवकर सुरू होणार्या फिजिओथेरपी उपचारांचे महत्त्व पालकांना समजावून सांगण्यात आले. नियमित फिजिओथेरपी, योग्य व्यायाम, दैनंदिन सराव आणि पालकांचा सक्रिय सहभाग यामुळे मुलांच्या हालचाली, कार्यक्षमता व स्वावलंबनामध्ये सुधारणा होण्यास मदत होते, याबाबत पालकांचे समुपदेशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागी मुलांना लेखन साहित्याचे संच व चॉकलेट्स देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. उपक्रम डॉ. दिक्षिता बखतवाणी, सहाय्यक प्राध्यापक, तसेच पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. सानिका वाघमोडे आणि डॉ. मुघदा ठेंगरे यांच्या सहभागातून यशस्वीरीत्या पार पडला. प्रत्येक मुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांचा सन्मान करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समान संधी मिळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Next Post
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add