• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

झाडावर कार आदळून भीषण अपघात ; तीन ठार तर दोन गंभीर जखमी

रावेर तालुक्यातील सावदा रस्त्यावरील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 20, 2024
in जळगाव जिल्हा
0
झाडावर कार आदळून भीषण अपघात ; तीन ठार तर दोन गंभीर जखमी

रावेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावदा ते पिंपरुळ रस्त्यावर भुसावळ येथून मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमावरून परतत असताना ५ मित्रांची भरधाव कार झाडावर आढळल्याने त्या तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेबाबत सावदा पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

शुभम दशरथ सोनार (वय २५, रा. नाला परिसर, रावेर), मुकेश किशोर रायपुरकर (वय २३, रा. गांधी चौक, रावेर) आणि जयेश केशव भोई (वय २२, रा. भोईवाडा, रावेर) असे मयत तरुणांची नावे आहेत. शुक्रवारी दि.२० डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून कारचा पूर्ण चूराळा झाला आहे. वरील तिघांसह गणेश संतोष भोई (वय २७, रा. भोईवाडा), आणि विकी उदय जाधव (वय २५, रा.स्टेशन रोड, रावेर) असे पाच जण भुसावळ येथे मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला गुरूवारी संध्याकाळी गेले होते. तेथून कार क्रमांक (एम एच २० सीएस ८००२) ने परतत असताना सावदा ते पिंपरूळ रस्त्यावर पहाटे ३ वाजताच्या सुमारास कार एका झाडावर जोरदार आदळली.

घटनेत कारचा पूर्ण चुराळा झाला असून शुभम सोनार, जयेश भोई आणि मुकेश रायपुरकर हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी गणेश भोई जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात तर विकी जाधव याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे रावेर तालुक्यात शोककळा पसरली असून सावदा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

पाचही मित्रांची कौटुंबिक पार्श्वभूमी..
मयत सर्व तरुण असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत शुभम दशरथ सोनार याला आई-वडील, तीन बहिणी असा परिवार असून तीन बहिणींच्या पाठीवरील तो एकुलता एक होता. त्याचे वडील सोनारी दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. जयेश केशव भोई याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करतात.

मुकेश किशोर रायपूरकर याच्या मागे आई आणि बहीण असून आई घरकाम करून उदरनिर्वाह करते. तर गंभीर जखमींमध्ये गणेश भोई यांच्या घरी आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, बहीण आणि दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. तो फोटोग्राफीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो.दुसरा गंभीर जखमी विकी जाधव हा २५ वर्षाचा विद्यार्थी असून त्याच्या घरी आई वडील, बहीण आहेत. वडील गॅरेजवर काम करून घर चालवितात.

Tags: accidentJalgaonRaver
Next Post
शिवाजीनगर उड्डाणपुलावर ट्रकने महिलेला चिरडले ; पती गंभीर जखमी

शिवाजीनगर उड्डाणपुलावर ट्रकने महिलेला चिरडले ; पती गंभीर जखमी

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add