• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवाजीनगर उड्डाणपुलावर ट्रकने महिलेला चिरडले ; पती गंभीर जखमी

जळगावातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 21, 2024
in जळगाव जिल्हा
0
शिवाजीनगर उड्डाणपुलावर ट्रकने महिलेला चिरडले ; पती गंभीर जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील अपघातांची मालिका सुरू असून शहरातील प्रमुख टॉवर चौकात दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी २० डिसेंबर रोजी घडली आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्यात घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंदना अशोक गोराडे (वय-४९, रा. राणीचे बांबरुड ता. पाचोरा) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचे पती अशोक सुखदेव गोराडे (वय-६०) हे गंभीर जखमी झाले आहे. मयताच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. राणीचे बांबरुड येथे अशोक सुखदेव गोराडे हे पत्नी वंदना गोराडे यांच्यासह वास्तव्याला आहेत. दरम्यान त्यांच्या चालकाच्या मुलाचा साखरपुडाचा कार्यक्रमासाठी ते पत्नी वंदना गोराडे यांच्यासोबत शुक्रवारी २० डिसेंबर रोजी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीजे ४७९६) ने जळगावातील टॉवर चौकाकडून शिवाजीनगर उड्डाण पुलावरून जात होते.

त्यावेळी भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एमएच २१ एबी ७४६६) ने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वंदनाबाई गोराडे या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला तर जखमी अशोक गोराडे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon_cityaccident
Next Post
अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add