• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विजयादशमीनिमित्त जळगावात रणरागिणी शस्र पूजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 12, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक, सामाजिक
0
विजयादशमीनिमित्त जळगावात रणरागिणी शस्र पूजन

जळगाव (प्रतिनिधी) : महिलावर्गास बळ देण्यासाठी, त्यांना स्व-संरक्षण करता यावे यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे विजयादशमी निमित्ताने जळगांव शहरात रणरागिणी शस्र पुजनाचा कार्यक्रम शहरातील नवीपेठ येथे जयप्रकाश नारायण चौकात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

जळगांव शहराच्या खासदार स्मिता वाघ, माजी महापौर सीमा भोळे, डॉ. केतकी पाटील, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सायली पाटील, सुमित्रा पटेल, विधिज्ञ अनुराधा वाणी यांनी शस्त्र पूजन करून उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचा मूळ उद्देश महिलांना हिम्मत देऊन त्यांना स्व-संरक्षणासाठी प्रेरित करणे, त्या दुर्गेचे रूप आहेत आणि देवीच्या हातात दांडिया नसून शस्त्र आहे याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी समितीच्या पूनम पाटील, धनश्री दहिवदकर, वैष्णवी बारी यांनी दंडसाखळी, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, कराटे यासारखे स्व-संरक्षण करणारे प्रात्यक्षिक सादर केले.

सूत्र संचालन हिंदु जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या दिव्या पाटील यांनी केले. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे समन्वयक सूरज दायमा, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, सुजय चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे गजानन तांबट, निरंजन चौधरी, निखिल कदम, सागर आवटे, जितेंद्र चौधरी, आशिष गांगवे इत्यादींचे सहकार्य लाभले.

Tags: Jalgaonvijyadashmi
Next Post
सणोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेकडून २६ अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वे गाड्या

सणोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेकडून २६ अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वे गाड्या

ताज्या बातम्या

नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना
जळगाव जिल्हा

नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना

July 14, 2025
जळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन: ३७४ पेक्षा अधिक पदांसाठी भरतीची संधी
जळगाव जिल्हा

जळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन: ३७४ पेक्षा अधिक पदांसाठी भरतीची संधी

July 14, 2025
टायगर ग्रुपच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी; शहराध्यक्षपदी विजय मोहिते
जळगाव जिल्हा

टायगर ग्रुपच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी; शहराध्यक्षपदी विजय मोहिते

July 14, 2025
मेहरूणमध्ये दोन कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन; नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव जिल्हा

मेहरूणमध्ये दोन कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन; नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश

July 14, 2025
बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारा जळगावचा चोरटा जेरबंद
गुन्हे

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारा जळगावचा चोरटा जेरबंद

July 14, 2025
ग्रामीण बोलीभाषेचे संरक्षण ग्रामीण साहित्यच करतात – संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल
जळगाव जिल्हा

ग्रामीण बोलीभाषेचे संरक्षण ग्रामीण साहित्यच करतात – संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल

July 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group