• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील भाविक ‘भारत गौरव पर्यटन रेल्वे’नी अयोध्येकडे रवाना

ढोल ताशांचा गजर, पारंपारिक नृत्य करून यात्रेकरूंचे स्वागत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 30, 2024
in जळगाव जिल्हा
0
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील भाविक ‘भारत गौरव पर्यटन रेल्वे’नी अयोध्येकडे रवाना

जळगाव, दि.३० : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८०० यात्रेकरुंची विशेष वातानुकुलीत ‘भारत गौरव पर्यटन रेल्वे’ अयोध्येकडे सोमवारी ३० सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात, ढोल ताशांचा गजरात, पारंपारिक नृत्य करून यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले. दरम्यान खा. स्मिता वाघ यांच्या हस्ते फीत कापून यात्रेकरूंचा रेल्वेत प्रवेश झाला.

खा. स्मिता वाघ,आ. लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी महापौर सिमाताई भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी श्री. अंकित, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, माजी नगरसेवक उज्वला बेंडाळे यांनी झेंडा दाखवून ही स्पेशल ट्रेन जळगाव स्टेशनवरून अयोध्येकडे रवाना झाली.

ढोल, ताशे, उत्सव कमानीने यात्रेकरूंचे स्वागत..
जळगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ४ वर सकाळी लवकर सजावटीसह वातानुकुलीत ‘भारत गौरव पर्यटन रेल्वे सज्ज होती. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेची स्वागत कमान लावण्यात आली होती. रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने अयोध्या दर्शनासाठी जात असल्यामुळे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभुषेत कलाकार मंचावर होते, पारंपारिक नृत्य केले जात होते. असे सगळ्या महोत्सवी वातावरणात यात्रेकरू त्यांना दिलेल्या बोगीत बसून आनंद व्यक्त करत होते.

शासन निर्णय १४ जुलै २०२४ अन्वये राज्यातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील एकुण ७३ तर महाराष्ट्र राज्यातील एकुण ६६ तिर्थस्थळांचा समावेश आहे. या योजनेसाठी जळगांव जिल्हयाला एकुण १००० उदिष्ट होते. सदर योजनेअंतर्गत पहिल्या टप्यासाठी श्रीराम मंदिर, अयोध्या हे स्थळ निश्चीत करण्यात आले. या योजनेसाठी जिल्हयातुन एकुण ११७७ अर्ज प्राप्त झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना जिल्ह्याचे समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून एकुण ८०० लाभार्थीची या योजनेसाठी लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी आय.आर.सी. टी .सी यांच्यासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार वातानुकुलीत ‘भारत गौरव पर्यटन’ ही विशेष रेल्वे करण्यात आली. ही रेल्वे जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी मार्गे अयोध्येकडे जाणार आहे. ही रेल्वे १ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता आयोध्येत पोहचणार आहे. २ ऑक्टोबर रोजी यात्रेकरू रामललाचे दर्शन घेतील. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी रात्री जळगावकडे ही रेल्वे निघेल. जळगाव येथे ४ ऑक्टोबर रोजी सकाळी पोहचेल अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली.

आय.आर.सी. टी.सी कडून व्यवस्था..
यात्रेकरूंना पाणी,चहा, बिस्कीट, नाष्टा, जेवण ही व्यवस्था त्यांच्याकडून असेल. तसेच आयोध्येत राहण्याची व्यवस्था पण आय.आर.सी. टी .सी करणार आहे. यात्रेकरूंना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदार( सर्वसाधारण ) सुरेश कोळी आणि त्यांच्या सोबत वैद्यकीय पथक, इतर सहायक अशी टीम सोबत असणार आहे.

 


Next Post
अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

ताज्या बातम्या

‘अयांश’च्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विश्वास
खान्देश

‘अयांश’च्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विश्वास

October 31, 2025
दुर्दैवी घटना: विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवलं; आत्महत्येचं कारण अस्पष्ट
खान्देश

दुर्दैवी घटना: विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवलं; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

October 30, 2025
विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड
क्रिडा

विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड

October 29, 2025
अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे होणार थाटात उद्घाटन; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची विशेष उपस्थिती!
खान्देश

अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे होणार थाटात उद्घाटन; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची विशेष उपस्थिती!

October 29, 2025
हैदराबादहून अंतराळ बलून उड्डाणे; जळगावात वैज्ञानिक उपकरणे पडण्याची शक्यता
खान्देश

हैदराबादहून अंतराळ बलून उड्डाणे; जळगावात वैज्ञानिक उपकरणे पडण्याची शक्यता

October 29, 2025
रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार चोपडा पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्टे, तलवारी जप्त
खान्देश

रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार चोपडा पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्टे, तलवारी जप्त

October 29, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group