• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रियकरानेच प्रेयसीचा केला खून ; अनैतिक संबंधाचा संशय

चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 28, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
प्रियकरानेच प्रेयसीचा केला खून ; अनैतिक संबंधाचा संशय

चोपडा, (प्रतिनिधी) : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन प्रियकराने आपल्या ४५ वर्षीय प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयीत अनिल विरची पावरा याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

गोरगावले खुर्द येथील बापशीबाई मोहन पावरा (वय ४५, रा. गोरगावले खुर्द, ता. चोपडा) परिवारासह राहत होत्या. शेतात मजूरी काम करुन त्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होत्या. (केपी)त्या महिलेचे गावातीलच अनिल विरची पावरा याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दि. २४ रोजी रात्रीच्या सुमारास अनिल पावरा हा बापशीबाई हीच्या घरी आला असता, त्याच्या घरातून अन्य एक पुरुष बाहेर जाताना दिसला. त्याला संशय आल्याने बापशीबाई हीला अनिल पावरा याने जाब विचारला.

तुझे अजून माझ्या व्यतिरिक्त अन्य कोणासोबत संबंध आहेत का अशी विचारणा केल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने अनिल पावरा याने बापशीबाई यांच्या गळ्यातील दोऱ्याने तीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर अनिल पावरा हा तेथून पसार झाला. याप्रकरणी महिलेचा मुलगा गणेश मोहन पावरा याच्या फिर्यादीवरून अडावद पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून केल्यानंतर पसार झालेला अनिल पावरा हा धुळे जिल्ह्यातील अंबाखंबाळे येथील जंगलात नातेवाईकांकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मुसळधार पावसात घनदाट जंगलातून सुमारे चार ते पाच किलोमीटर पर्यंत पायी वाट काढत नातेवाईकांकडे लपून बसलेल्या संशयित अनिल पावरा याच्या मुसक्या आवळल्या. (केपी)संशयित अनिल पावरा याला अटक केल्यानंतर त्याला चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने संशयित अनिल पावरा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद वाघ, पोउनि राजू थोरात, पोहेकॉ शेषराव तोरे, पोहेकॉ संजय बनगर, किरण शिरसाठ, पो.ना. विनोद धनगर, सतिष भोई यांच्या पथकाने यांच्या पथकाने केली.


 

Tags: CrimeJalgaon
Next Post
सरपंचाने मागितली दहा हजार रुपयांची लाच ; दोघांवर गुन्हा दाखल

सरपंचाने मागितली दहा हजार रुपयांची लाच ; दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add