पारोळा पोलिसांची कारवाई
पारोळा, (प्रतिनिधी) : येथील एका आरोपीकडून चोरीच्या १९ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यास अटक करण्यात आली आहे. किशोर संजय चौधरी (रा. तरवाडे ता. पारोळा ह.मु. सातपुर कॉलनी, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.
पारोळा पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीनुसार किशोर चौधरी हा नाशिक शहरातुन व इतर परीसरातुन दुचाकी चोरुन पारोळा तालुक्यातील आडगाव, तरवाडे, शिवरे परीसरात कमी किमतीत वाहने विकतो. तो पुन्हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यास पारोळा पो.स्टे. हददीत येणार आहे, असे समजल्यावरून पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी पारोळा पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक राजु जाधव, पोहेका प्रविण पाटील, पोना संदिप सातपुते, पोकों अभिजित पाटील यांना तात्काळ किशोर संजय चौधरी याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यावरुन पथकाने तीन दिवस पाळत ठेऊन आरोपीचा शोध घेत होते. दि. १२ रोजी पारोळा शहरातील कजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरात किशोर चौधरी मिळुन आला. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने नाशिक शहर हद्दीतून व परिसरातुन मोटार सायकली चोरी केले असल्याची कबुली दिली. त्याचेकडुन चोरी केलेल्या १९ मोटार सायकली हस्तगत करुन जप्त करण्यात आल्या आहेत. हि कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, कविता नेरकर पवार, सुनिल नंदवाळकर याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.