• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतात गांजाची शेती ! ; शेतकऱ्यावर गुन्हा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 13, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शेतात गांजाची शेती ! ; शेतकऱ्यावर गुन्हा

भोकर पळसोद शिवारातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : कपाशीच्या शेतात गांजाची झाडे लावणाऱ्या प्रकाश दशरथ सोनवणे (५८, रा. भोकर, ता. जळगाव) या शेतकऱ्याच्या शेतात कारवाई करीत गांजाची २७ झाडे जप्त करण्यात आली. ही कारवाई बुधवारी तालुका पोलिसांनी भोकर-पळसोद शिवारात केली. या प्रकरणी शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

भोकर-पळसोद शिवारात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून तालुका पोलिस शेतात पोहचले. शेतात कपाशीच्या पिकात गांजाचे २७ झाडं लावलेली आढळून आली. पोलिसांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, कृषी अधिकारी अमित भामरे, वजन मापे निरीक्षक अनंत पाटील यांना बोलवून खात्री करीत पंचनामा केला.

ही झाडं जप्त करण्यात आली असून १२ किलो वजन व अंदाजे ४० हजार रुपये त्याची किंमत आहे. या प्रकरणी प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे. ही कारवाई तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, सपोनि अनंत अहिरे, पोउनि गणेश सायकर, नयन पाटील, पोहेकॉ दीपक चौधरी, बापू पाटील, किरण अगोणे, चेतन पाटील, प्रवीण पाटील, दिनेश पाटील यांनी केली.

Tags: CrimeganjaJalgaon
Next Post
जिल्हा पेठ युवक मित्र मंडळातर्फे यंदा तामिळनाडू मधील सुवर्ण मंदिराचा देखावा

जिल्हा पेठ युवक मित्र मंडळातर्फे यंदा तामिळनाडू मधील सुवर्ण मंदिराचा देखावा

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add