• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातून दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 9, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
चोपडा तालुक्यातून दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; ६ दुचाकी हस्तगत

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या आरोपीला चोपडा तालुक्यातील कर्जाणा गावातून रविवारी दि. ८ सप्टेंबर रोजी अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या एकुण सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

दीपक सुमाऱ्या बारेला (वय -२९ रा. कर्जाणा ता. चोपडा) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी संदीप पाटील आणि प्रवीण मांडोळे हे चोपडा तालुक्यात गस्त घालीत असतांना त्यांना दीपक बारेला हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. याबाबत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती दिली. त्यानुसार त्यांनी पथकातील संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागुल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकूर असे पथक चोपडा तालुक्यातील कर्जाणा गावात रवाना केले.

दरम्यान संशयित आरोपी हा त्याच्या गावात कर्जाणा येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने पाचोरा, पारोळा आणि धुळे जिल्ह्यातील मोहाडी या ठिकाणाहून वेगवेगळ्या ६ दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्याला पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Tags: CrimeJalgaon
Next Post
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या पहिल्या टप्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या पहिल्या टप्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’
जळगाव जिल्हा

विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

March 9, 2026
गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा
जळगाव जिल्हा

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

March 9, 2026
महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group