स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची कामगिरी ; दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत
जळगांव, (प्रतिनिधी) : जळगावातील दादावादी परिसरात तीन भामट्यांनी कारमध्ये असणारी सव्वालाखांची रोकड असलेली बॅग गुजरातच्या व्यापार्याची पळविली होती. मात्र या घटनेची माहिती कळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासांमध्ये पाठलाग करून तीन जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
सुरत येथील व्यापारी हिराभाई किरीटभाई रावल हे भुसावळ या ठिकाणी हुंडाई गाडी क्रमांक (जीजे ०१ आर एल ८१८८) ने जात होते. जळगाव येथील दादावाडीतील पेट्रोल पंपाजवळ आसलेल्या आयडीबीआय बँकच्या एटीएम समोर थांबलेले होते. तेवढ्यात ३ जण मोटरसायकलवर आले. त्यातील एकाला चक्कर आल्याचे नाटक त्यांनी केले. त्यावेळेस दुसऱ्याने कारमध्ये असलेली बॅग ज्यामध्ये १ लाख २० हजार रुपये होते ती घेऊन भुसावळच्या दिशेने पसार झाला.
दरम्यान त्यांचे लोकेशन शोधून पोलिस वाहन चालक महेश सूर्यवंशी यांनी अति वेगाने वाहन चालून त्यांना भुसावळ येथे शेतात पळून जात असताना पाठलाग केला. एलसीबी टीम पीएसआय दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, अतुल वंजारी, पोहे हिरालाल पाटील, राजेश मेढे, चिन्मय पाटील यांनी संशयित आरोपी जितेंद्र रामलाल चव्हाण (वय ३२, रा. टाहकळी ता. मुक्ताईनगर), राजेंद्र मधुकर जाधव (वय ३१), बंडू जेता राठोड (वय २८, मुराझिरा, मुक्ताईनगर) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मोटरसायकल व १ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.