जळगाव (प्रतिनिधी ) : बंद घराचे कडी कोयंडा तोडून शहरातील दादावाडी येथील श्रीराम नगरातून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरातून गॅस सिलेंडर चोरून नेल्याची घटना शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील दादावाडी येथील श्रीराम नगरात तुकाराम नामदेव गांधिले वय-६३ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहे. दरम्यान ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ३१ ऑगस्ट सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत गॅस सिलेंडर चोरून नेल्याचा प्रकार समोर आला. याबाबत सोमवारी २ सप्टेंबर रोजी जळगाव तालुका पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.