• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बैलांना पाणी पाजण्यासाठी गिरणानदीत गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 27, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधि ) ;– शहरापासून जवळ असलेल्या खेडी खुर्द येथे राहणारा तरूण शेतकरी हा बैलांना पाणी पाजण्यासाठी गिरणानदीत गेला असता पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली आहे. याबाबर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ईश्वर सोमा कोळी वय-३२ रा. खेडी खुर्द ता. जळगाव असे मयततरूण शेतकऱ्याचे नाव आहे.

ईश्वर कोळी हा तरूण आपल्या आईवडील, भाऊ व वहिनी यांच्यासोबत खेडी खुर्द गावात वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. खेडी खुर्द शिवारातील गिरणा नदी काठावर त्यांचे शेत आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ते बैलांना पाणी पाजण्यासाठी गिरणीनदीत गेला असता त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ईश्वर कोळी हा पाण्यात पडला. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.

दरम्यान दोन्ही बैल हे सायंकाळी ५ वाजता घरी आले. परंतू ईश्वर कोळी सोबत नव्हता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा रात्री उशीरापर्यंत सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शेत शिवारातील गिरणा नदीपात्रात ईश्वरचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह नेण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मुदस्सर काझी हे करीत आहे.

Tags: CrimeJalgaon
Next Post
जळगाव जिल्ह्यातील तिघांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई

जळगाव जिल्ह्यातील तिघांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई

ताज्या बातम्या

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add