• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 18, 2026
in गुन्हे
0
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील एचडीएफसी बँकेसमोरून धाडसी चोरी करणाऱ्या आरोपीला शनीपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली ₹१,००,००० ची संपूर्ण रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक स्कूटर जप्त केली आहे.

​घटनेची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी अबरार अली इरफान अली चौधरी (२६, रा. मेहरूण) हे १३ जुलै २०२६ रोजी दुपारी कालिका माता मंदिर चौकातील बँकेत आले होते. त्यांनी आपली मोटरसायकल पार्क करून पाणीपुरी खात असताना, अज्ञात चोराने त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून ₹१,००,००० ची रोकड चोरून नेली. याप्रकरणी १६ जुलै २०२६ रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल व त्यांच्या शोध पथकाने तातडीने तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळ परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले. तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रवि जगदीश प्रजापत (वय ३६ वर्षे, रा. प्रजापत नगर, मामुराबाद रोड, जळगाव) याला निसर्ग कॉलनी, असोदा रोड येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण रोकड आणि गुन्ह्यातील स्कूटर हस्तगत केली आहे.

​या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांनी पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे व संपूर्ण शोध पथकाचे कौतुक केले आहे. दरम्यान, नागरिकांनी आपल्या वाहनांच्या डिक्कीत किंवा वाहनात निष्काळजीपणे मोठी रोकड अथवा मौल्यवान वस्तू ठेवू नयेत, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


 

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

ताज्या बातम्या

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add