तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) : जुन्या भांडणातून एका तीस वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रामेश्वर कॉलनी परिसरात उघडकीस आली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की खुशाल बाळू मराठे (वय 30) राहणार रामेश्वर कॉलनी हा तरुण आपल्या परिवारासह राहायला असून रविवारी १८ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास खुशाल मराठे याला संशयित पिण्या उर्फ शुभम राठोड, अभय चव्हाण आणि रितेश गोंधळे तिघी राहणार रामेश्वर कॉलनी यांनी जुनावाद उकरून खुशाल वर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली.
या घटनेबाबत १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशनला खुशाल मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिण्या उर्फ शुभम राठोड, अभय चव्हाण आणि रितेश गोंधळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.