14 दुचाकी आणि सहा ऑटोरिक्षा 22 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी) – शहर तसेच जिल्ह्यातील विविध भागातून महागड्या दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून तीन जणांना अटक करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत पोलीस सूत्रांना मिळालेली माहिती अशी की शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या एका मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्या प्रकरणी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एक व्यक्ती चोरीची दुचाकी वापरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संघपाल तायडे, पोलीस हवालदार मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, सागर पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या प्रकरणांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड ,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, श्रीकृष्ण पटवर्धन ,पोहेकॉ संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव ,सागर पाटील, संदीप पाटील, जयवंत चौधरी, प्रदीप चौरे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, दीपक चौधरी, भारत पाटील आदींचे पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाने धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे स्टेशन रोडवरील शनी नगर येथे राहणाऱ्या मुस्तकीन अजित पटेल (वय 28) याची चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर दोन साथीदार आम्हीं कालू मनियार (वय 39) राहणार रंगारी मोहल्ला पाळधी आणि जाबीर सलामत शेख (वय 27) राहणार ईदगाह प्लॉट पाळधी यांच्यासोबत मिळून दोन वर्षांपूर्वी जळगाव शहरातून मोटरसायकलची चोरी केल्याचे कबूल केले. तसेच त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजी नगर, खारघर, नवी मुंबई, जुहू मुंबई, बारडोली गुजरात, तसेच इतर शहरातून महागड्या दुचाकी व ऑटो रिक्षा चोरी करून वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री केल्याचे सांगितले.
त्यांच्याकडून पोलिसांनी 14 मोटरसायकल व 6 ऑटो रिक्षा अशा एकूण 22 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीनही आरोपींना जळगाव शहर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपार पोलीस अधीक्षक अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली.