एलसीबीच्या पथकाने आवळल्या आरोपीच्या मुसक्या ; सावदे हत्येचा उलगडा
जळगाव (प्रतिनिधी ) दारूचे व्यसन असलेल्या आपल्या लहान भावाची बैलगाडीचे शिंगाडे डोक्यात टाकून त्याची निर्घृण हत्या केल्याची थराररक घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. मात्र हि हत्या मयत इंदल प्रकाश वाघ याचा मोठा भाऊ दीपक प्रकाश वाघ याने केल्याचे एलसीबीच्या तापसातून उघड झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अमळनेर पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवालकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, धरणगावचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या.
लहान भावाचा खून केल्यानंतर दीपक हा दिवसभर जिल्हा रुग्णालयात उपस्थित होता. तर दुसरीकडे एलसीबीचे पथक संशयिताचा शोध घेत होते. मात्र एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर तपासाचा धागा गवसताच पथकाने संशयित दीपक वाघ याच्या मुसक्या आवळल्या. इंदल याने दारु पिवून मोठा भाऊ दीपक सोबत वाद घातल्या नंतर तो घराबाहेर निघून गेला. तो बस स्थानकाकडे जात असतांना संशयित दीपक हा देखील त्याच्या मागे गेला. याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये वाद झाले. या वादातून दीपक याने संतापाच्या भरात इंदल याच्या डोक्यात बैलगाडीचे शिंगाडे मारल्याने तो जमीनवर कोसळला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाशखाली पाळधीचे सपोनि प्रशांत कंडारे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, गणेश वाघमारे, अनिल जाधव, सफौ विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकॉ जितेंद्र पाटील, दीपक माळी, निलेश सोनवणे, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, रविंद्र पाटील यांच्या पथकाने केली.