• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी मारल्या उड्या ; २० जण जखमी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 11, 2024
in गुन्हे, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
0
आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी मारल्या उड्या ; २० जण जखमी

अमृतसर हावडा मेल एक्सप्रेसमधील घटना

कोलकाता (वृत्तसंस्था )  : हावड़ा येथून अमृतसर कडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 13006 अमृतसर हावडा मेल एक्सप्रेसच्या जनरल डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या टाकल्याने सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सात प्रवाशांना शाहजहापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. अलिकडे ट्रेनचे अपघात वाढल्याने प्रवाशांना वाटले खरीच आग लागली आहे. त्यामुळे प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या टाकल्याचे उघडकीस आले आहे.

रविवारी सकाळी सुमारे 8:00 वाजताच्या दरम्यान बरेली आणि मीरानपुर कटरा स्टेशन दरम्यान अमृतसर हावडा मेलच्या जनरल कोचमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने चालकाने ट्रेनला ब्रेक लावले, तेव्हा अर्धी ट्रेन नदीच्या पुलावर आणि अर्धी ट्रेन पुलाच्या बाहेर उभी होती. ट्रेन थांबताच लोकांनी घाबरुन कोणताही विचार न करता बोगीतून पटापट उड्या टाकल्या. त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले.

या घटनेत अनेक प्रवासी केवळ घाईगडबडीत उडी टाकल्याने जखमी झाले आहेत. बोगी रिकामी झाल्यानंतर ट्रेनच्या डब्याची तपासणी केली गेली. तेव्हा कुठेही काही जळल्याचे पुरावे सापडले नाहीत. पाच एम्ब्युलन्सना बोलावून जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे ट्रेन अर्धा तास थांबली होती. तपासणी अंती कोणताही अनुचित प्रकार आढळला नाही. त्यामुळे ट्रेनला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

दरम्यान बिलपुरजवळ सकाळी काही टवाळखोर तरुणांनी ट्रेन नंबर 13006 च्या जनरल जीएस कोचमधील ठेवलेले अग्निशमन यंत्र चालवले. त्यामुळे गाड़ीला थांबविण्यात आले. डब्यात धुर पसरल्याने लोकांना वाटले ट्रेनला आग लागली, आणि प्रवाशांनी उड्या मारल्या. दरम्यान टवाळखोर प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.


Tags: Crimehawda amrutsar express
Next Post
गुटख्याचे वाहन परस्पर सोडून दिल्याप्रकरणी चार पोलीस निलंबीत

अमळनेरात बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी घातला ११ लाखांचा गंडा

ताज्या बातम्या

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक
खान्देश

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक

June 19, 2025
शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

June 19, 2025
शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
खान्देश

शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 19, 2025
सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन
जळगाव जिल्हा

सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन

June 18, 2025
बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !
जळगाव जिल्हा

बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !

June 18, 2025
थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group