पाचोरा (प्रतिनिधी): गोर सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने तिज महोत्सवा निमित्त स्वाभिमानी बंजारा समाज मेळावा शुक्रवारी घेण्यात आला. या मेळाव्या प्रसंगी हजारो महिला भिगीनी समाज बांधव उपस्थित होते. बोगस भामटा राजपूत प्रकरणात शासनाने नेमलेली एसआयटी वर पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांनी बंजारा समाजा विरोधात भूमिका घेऊन विधानसभेत प्रश्न उपस्थित करून बोगस भामटा राजपूत प्रकरणी शासनाने नेमलेली एसआयटी रद्द केल्याचा आरोप करण्यात आला. त्या मुळे समाजाचा करिता असलेले आरक्षण भामटा राजपूत ला मिळत आहे. त्यामुळे बंजारा समाजातील तरुण नोकरी पासून वंचित करण्याचे पाप आमदार पाटील यांनी केले आहे. असाही आरोप मेळाव्यात केला गेला.
दरम्यान आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाचोरा भडगाव मतदार संघात इतर कोणत्याही उमेदवारास मतदान करावे पण आ. किशोर पाटील यांना मतदान करू नये. या बाबत सर्व वक्त्यानी बंजारा समाज बांधवांना आवाहन केले. शेवटी उपस्थित सर्व समाज बांधवानी एकमताने बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची शपथ घेऊन आवाहनाला संमती दिली. सदर मेळाव्यात प्रथम तिज उत्सव चे पारंपरिक बंजारा लेंगी व महिलांचे गीता चे सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य झाले. तसेच या मेळाव्यात मान्यवरांनी वक्त्यांनी समाजास मार्गदर्शन करताना समाजाच्या विविध अडी अडचणी व समाजा चे प्रश्न या बाबत वक्तव्य केले.
यावेळी गोर सेना अध्यक्ष संदेश चव्हाण, सुभाष जाधव, अरुण पवार, अर्जुन जाधव, चेतन जाधव, शाम जाधव, उत्तम राठोड, अरविंद जाधव, भिमराव जाधव, योगेश राठोड, भाऊल चव्हाण, मोरसिंग राठोड, माधव राठोड, देविलाल चव्हाण, प्रविण चव्हाण, रतिलाल, हेमराज राठोड, दलित मित्र मोरसिंग राठोड, संतोष राठोड, गोर सेनेचे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व समाजातील नायक कारभारी सरपंच व विविध क्षेत्रातील सामाजिककार्यकर्ते उपस्थित होते.