• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचे आणखी एक वैद्यकीय यश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 26, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील आठ वर्षीय बालकावर जन्मत: हृदयाला छिद्र (व्हीएसडी) असतानाही यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन देण्यात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मोठे यश संपादन केले आहे.

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील विदीत नामक ८ वर्षीय बालकाला काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच वारंवार कफाचा त्रास जाणवत होता. कुटुंबीयांनी स्थानिक स्तरावर उपचार केले, मात्र समाधानकारक फरक पडत नसल्याने त्यांनी पुढील तपासणीसाठी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालय येथे संपर्क साधला.

रूग्णालयात बालकाची सखोल तपासणी करण्यात आली. अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत बालकाच्या हृदयात जन्मत: छिद्र असल्याचे स्पष्ट झाले. ही स्थिती वेळेवर लक्षात न आल्यास भविष्यात गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निदान झाल्यानंतर तातडीने उपचाराचा निर्णय घेण्यात आला. रूग्णालयाच्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून या बालकाची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली.

या टीमने केली शस्त्रक्रिया..
हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोगतज्ज्ञ डॉ. धवलकुमार खडके, डॉ. भूषण चव्हाण, डॉ. सिध्देश्वर खांडे, डॉ. झिशान सय्यद, डॉ. मनमिता रेड्डी यांच्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक व्हीएसडी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर बालकाची प्रकृती स्थिर असून तो आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. काही दिवसांच्या निरीक्षणानंतर त्याला लवकरच घरी सोडण्यात आले.

▪️जन्मत: हृदयातील छिद्र ही समस्या अनेक बालकांमध्ये आढळते. योग्य वेळी निदान व उपचार केल्यास ती पूर्णपणे बरी होऊ शकते. पालकांनी मुलांमध्ये श्वास घेण्यास त्रास, वजन न वाढणे, वारंवार सर्दी-कफ होणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता तातडीने तपासणी करून घ्यावी. तसेच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दर आठवड्याला बालकांच्या हृदयाची मोफत तपासणी केली जाते. या सुविधेचा लाभ ग्रामीण भागातील गरजू रुग्णांनी घ्यावा. लवकर निदान केल्यास मोठ्या शस्त्रक्रियाही सुरक्षितपणे करता येतात.
– डॉ. वैभव पाटील, विभागप्रमुख हृदयालय.

Tags: Jalgaon

ताज्या बातम्या

जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

May 26, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा
जळगाव जिल्हा

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 26, 2026
तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला ‘अन्न व औषध प्रशासन’ आयुक्तपदाचा कार्यभार
महाराष्ट्र

तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला ‘अन्न व औषध प्रशासन’ आयुक्तपदाचा कार्यभार

May 26, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘स्मार्ट’ कंपनीचा मनमानी कारभार
जळगाव जिल्हा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘स्मार्ट’ कंपनीचा मनमानी कारभार

May 26, 2026
जळगावात युवक काँग्रेसचे आंदोलन; ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवासाची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात युवक काँग्रेसचे आंदोलन; ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवासाची मागणी

May 25, 2026
वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती
आरोग्य

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

May 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group