• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई ; अतिरेकी रिजवान अलीला अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 9, 2024
in खान्देश, महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई ; अतिरेकी रिजवान अलीला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;-पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित अतिरेक्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. देशात 15 ऑगस्टची तयारी सुरु झाली असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला हे मोठे यश मिळाले आहे. त्या अतिरेक्यावर राष्ट्रीय तपास संस्थेनेही लाखोंचे बक्षीस ठेवले होते. रिजवान अली असे या खतरनाक दहशतवाद्याचे नाव असून दिल्लीतील दर्यागंजमधून त्याच्या मुसक्या आवळल्या. रिजवान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिल्लीतील अनेक व्हीआयपी परिसरांची रेकी केली होती.

15 ऑगस्टपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या रिजवानवर एनआयएने तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. रिजवान हा पुणे इसिस मोड्युल सोबत जोडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एनआयएकडून रिजवान अलीसंदर्भात इनपूट दिल्ली पोलिसांना मिळाले. त्यानंतर रात्री 11 वाजता बायोडायवर्सिटी पार्क येथे त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी काही हत्यार देखील जप्त केली आहे. त्यात एक स्टार पिस्तूल, 3 कारतूस आणि 2 मोबाइल फोन जप्त केले आहे.

रिजवान पुणे आयएसआयएस मॉड्यूलमधील सर्वात धोकादायक अतिरेकी आहे. या मॉड्यूलमधून अनेकांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. परंतु रिझवान फरार होता. त्याने दिल्ली, मुंबईतील अनेक व्हिव्हिआयपी भागांची तपासणी केली होती. रिझवान याला एनआयएने मोस्ट वॉन्टेडच्या यादीत टाकले होते. त्याने आयईडी तयार करुन त्याची चाचणी केली होती. तो त्यातील तज्ज्ञही होता. अतिरेक्यांची स्पेशल सेल टीमकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

Tags: CrimeDELHI POLICEISIS
Next Post
गुटख्याचे वाहन परस्पर सोडून दिल्याप्रकरणी चार पोलीस निलंबीत

गुटख्याचे वाहन परस्पर सोडून दिल्याप्रकरणी चार पोलीस निलंबीत

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add