हेमंत पाटील | जळगाव, दि. 20 – शहरातील रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी अनोखे आंदोलन केले. दरम्यान महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांना निवेदन दिले. निवेदनात माझी किडनी विकून येणाऱ्या पैशात रस्ते दुरुस्त करावे. अशी मागणी त्यांनी केली आहे.
वारंवार तक्रार करूनही प्रशासनाला जाग येत नाही, त्याच बरोबर पालिकेकडे निधी नसल्याचे देखील सांगण्यात येते. म्हणून हे पाऊल उचलले असल्याचे दिपककुमार गुप्ता यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने दोन लहानग्या मुलांनी देखील रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला विनंती केली.
यावेळी शिवराम पाटील, अमोल कोल्हे, ललित शर्मा आदी सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते.
रस्त्या संदर्भातील गुप्ता यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला आतातरी जाग येईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पहा.. व्हिडिओ