• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अखिल भारतीय लेवा पाटिदार युवक महासंघाची विस्तार नियोजन बैठक संपन्न

भुसावळ तालुकाध्यक्ष पदी अक्षय बेंडाळे यांची निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 20, 2021
in सामाजिक
0
अखिल भारतीय लेवा पाटिदार युवक महासंघाची विस्तार नियोजन बैठक संपन्न

वरणगाव, दि.20 – भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यांच्या विविध गावांमधील असंख्य तरुण अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघात प्रवेश करण्यास ईच्छुक आहेत. त्यापार्श्वभुमीवर पदविस्तार व नियोजन करण्यासाठी वरणगाव येथे आढावा बैठक घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सप्तश्रृंगी माता, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला वंदन करून व प्रदेशाध्यक्ष प्रदिप (बंडू) भोळे व जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित युवकांच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कोल्हे यांनी केले त्यामध्ये त्यांनी सांगितले कि, आज लेवा समाज बांधवांनी एकत्र येणे व कुठेही समाजावर अन्याय होत असल्यास त्याठिकाणी आवाज उठवणे, समाजबांधवांना सहकार्य करणे ही काळाची गरज आहे. तसेच समाजकार्याची आवड असणाऱ्या चांगल्या युवकांनी मोठ्या संख्येने महासंघात यावे असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्रदीप (बंडू) भोळे यांनी ग्रामीण भागातील बहुतांश लेवा समाजाचा शेती हा पिढीजात व्यवसाय असुन शेती बरोबरच पूरक जोड धंदा व आधुनिक शेती केल्याने युवक बरोजगारी वर मात करून समाजाची उन्नती होईल आणि गावोगावी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या शाखा लावणे व समाजकार्याची पद्धत आदि विषयांवर मार्गदर्शन केले .

यावेळी सर्व उपस्थित युवकांनी स्वतःचा परिचय करुन दिला. भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यांमध्ये महासंघाच्या 20 शाखा युवकांनी तयार केलेल्या असुन लवकरच त्या शाखांचे उदघाटन करण्यात येणार आहे व सरदार वल्लभभाई पटेल जयंती पर्यंत 100 शाखांचे अनावरण करण्याचे महासंघाचे नियोजन व उद्दिष्ट आहे. उपस्थित सर्वानुमते आचेगावचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय बेंडाळे यांची भुसावळ तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच प्रदेशाध्यक्ष भोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋषिकेश कोलते यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले. यावेळी अक्षय दिलीप बेंडाळे, ऋषिकेश कोलते, आकाश डिंगबर पाटील, रोशन अरुण इंगळे, सागर उद्धव पाटील, मयूर अनिल इंगळे, विशाल विनोद पाटील, प्रदीप रमेश वारके, कुणाल सुरेश नेमाडे, नरेंद्र पुरुषोत्तम पाटील, शुभम ज्ञानदेव पाटील, रुपेश अरुण पाटील, प्रतीक संजय इंगळे, प्रणव निलेश पाटील, लोकेश सुधाकर पाटील, संकेत संतोष वारके, प्रवीण मधुकर इंगळे, प्रथमेश यादव पाटील, जितेंद्र शेणफळू पाटील, ऋषिकेश विजय पाटील, विशाल सुरेश नेमाडे, विष्णू इंगळे, चेतन रवींद्र भोळे, कल्पेश उखर्दू पाटील, लोकेश राजेंद्र खाचणे, शुभम किशोर खर्चे, दशरथ दिलीप पाटील, गोविंदा जनार्धन पाटील, देवेंद्र विष्णू इंगळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Next Post
‘माझी किडनी विका, पण शहरातील रस्ते दुरूस्त करा’.. – दीपककुमार गुप्ता

'माझी किडनी विका, पण शहरातील रस्ते दुरूस्त करा'.. - दीपककुमार गुप्ता

ताज्या बातम्या

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!
जळगाव जिल्हा

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

June 20, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन
आरोग्य

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन

June 20, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन
जळगाव जिल्हा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन

June 20, 2026
विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित
जळगाव जिल्हा

विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

June 20, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

June 19, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध

June 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group