• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंधावर संयुक्त सभा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 14, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

जळगाव, प्रतिनिधी : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यासाठी रॅगींग प्रतिबंधात्मक कायदा अंमलात आला आहे. रॅगींग करणे हा कायद्याच्यादृष्टीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सांगितले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रॅगींग प्रतिबंधात्मक संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. माया आर्विकर, डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. सी.डी. सारंग, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, सुरेंद्र गावंडे, कांचन रोटे, महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वराज सुर्या, सिद्दीका मुस्कान यांच्यास समितीचे सदस्य उपस्थित होते. संयुक्त सभेच्या सुरूवातीला प्रा. डॉ. बापुराव बिटे यांनी रॅगींग या प्रकाराविषयीची माहिती आणि त्याचे परिणाम याबाबत सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.

त्यानंतर डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना सांगितले की, प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना आदराची भावना ठेवली पाहीजे. कुठल्याही परीस्थितीत महाविद्यालयात रॅगींग खपवून घेतली जाणार नाही. रॅगींग करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून आयुष्य उद्ध्वस्त करणारा प्रकार असल्याचे डॉ. सोळंके यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी देखील विद्यार्थ्यांना रॅगींग प्रतिबंधाविषयीच माहिती देत महाविद्यालयाचा परिसर हा रॅगींग मुक्त परिसर असल्याचे सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी रॅगींग प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाला एमबीबीएस अभ्यासक्रमाचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील लिपीकांसह सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.


 

ताज्या बातम्या

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
जळगाव जिल्हा

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

November 14, 2026
डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा
जळगाव जिल्हा

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा

November 14, 2026
गोदावरी लक्ष्मी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी लक्ष्मी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा उत्साहात

November 13, 2026
लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम.. – ॲड. नीलम शिर्के सामंत
जळगाव जिल्हा

लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम.. – ॲड. नीलम शिर्के सामंत

November 13, 2026
जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!
आरोग्य

जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!

November 12, 2026
जनजातीय गौरव सेवा सप्ताहातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा – ना. गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जनजातीय गौरव सेवा सप्ताहातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा – ना. गुलाबराव पाटील

November 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add