• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हाभर पोलिसांची विशेष तपासणी मोहीम; वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका

मद्यपान करून वाहन चालविण्याची ४९ प्रकरणे उघड; नियमभंगाच्या ५२६ प्रकरणांत दंडात्मक कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 15, 2026
in Uncategorized
0
जिल्हाभर पोलिसांची विशेष तपासणी मोहीम; वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका

जळगाव, प्रतिनिधी : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ५२६ प्रकरणांत कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ३० जणांविरुद्धही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध भागांत एकाचवेळी ही मोहीम राबविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार आणि वाहतूक शाखेच्या पथकांनी रस्त्यांवर वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली.

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष

तपासणीदरम्यान मद्यपान करून वाहन चालविण्याची ४९ प्रकरणे समोर आली. यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार इतर नियमभंगाच्या ३५६ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. फॅन्सी नंबर प्लेट वापरण्याच्या १५, कलम १९४ बी अंतर्गत ३१, दुचाकीवर तीन जण प्रवास करण्याची चार, वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे एक, कलम ६६/१९२ अंतर्गत आठ आणि हेल्मेट न वापरण्याची ६२ प्रकरणे नोंदविण्यात आली.

वाहतूक नियमभंगाच्या या सर्व ५२६ प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केली. त्यातून २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ३० जणांवरही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

मद्यपान करून वाहन चालविल्याने चालकासह रस्त्यावरील अन्य नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. वेगवेगळ्या प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे वाहन चालविताना नियमांचे पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

या विशेष मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित (जळगाव), अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव), जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच जळगाव, चाळीसगाव आणि भुसावळ शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.


 

ताज्या बातम्या

जिल्हाभर पोलिसांची विशेष तपासणी मोहीम; वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका
Uncategorized

जिल्हाभर पोलिसांची विशेष तपासणी मोहीम; वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका

November 15, 2026
लाच स्वीकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
गुन्हे

लाच स्वीकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

November 15, 2026
जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात
गुन्हे

लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह तिघे जाळ्यात

November 15, 2026
अखेर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; ॲड. अनिकेत निकम यांनी रिक्षाचालकाची पोलीस ठाण्यात मांडली बाजू
गुन्हे

अखेर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; ॲड. अनिकेत निकम यांनी रिक्षाचालकाची पोलीस ठाण्यात मांडली बाजू

November 15, 2026
रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
जळगाव जिल्हा

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

November 14, 2026
डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा
जळगाव जिल्हा

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा

November 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add