• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह तिघे जाळ्यात

वीजचोरीचा गुन्हा टाळण्यासाठी मागितली होती ४० हजारांची लाच; १५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 15, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, प्रतिनिधी :

वीजचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह दोन वरिष्ठ तंत्रज्ञांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ पकडले. जळगावातील पांडे चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. विशाल वसंत नेमाडे (वय ३७), भरत कडू तायडे (वय ४५) आणि रवींद्र छन्नू पाटील (वय ४१, सर्व रा. जळगाव) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

एका ४० वर्षीय तक्रारदाराच्या घरी या तिघांनी नवीन वीजमीटर आणि उपकरणांची पाहणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराला पांडे चौकात बोलावून वीजभार अधिक असल्याचे तसेच सर्व्हिस वायर बायपास करून वीजचोरी होत असल्याचे सांगितले. या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी त्यांनी ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने केलेल्या पडताळणीनंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार शनिवारी पांडे चौक परिसरात सापळा रचण्यात आला. भरत तायडे याने लाचेची रक्कम विशाल नेमाडे यांच्याकडे देण्यास सांगितले. नेमाडे यांनी १५ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, हवालदार बाळू मराठे, कर्मचारी राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.


 

Next Post
लाच स्वीकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

लाच स्वीकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

लाच स्वीकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
गुन्हे

लाच स्वीकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

November 15, 2026
जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात
गुन्हे

लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह तिघे जाळ्यात

November 15, 2026
अखेर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; ॲड. अनिकेत निकम यांनी रिक्षाचालकाची पोलीस ठाण्यात मांडली बाजू
गुन्हे

अखेर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; ॲड. अनिकेत निकम यांनी रिक्षाचालकाची पोलीस ठाण्यात मांडली बाजू

November 15, 2026
रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
जळगाव जिल्हा

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

November 14, 2026
डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा
जळगाव जिल्हा

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा

November 14, 2026
गोदावरी लक्ष्मी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी लक्ष्मी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा उत्साहात

November 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add